पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एसएनडीटी या जलवाहिनीमध्ये गळती झाल्यामुळे एसएनडीटी केंद्रासाठी होणारा पाणीपुरवठा महापालिकेच्या वतीने बंद करण्यात आला आहे. या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी वेळ लागणार असल्याने आज, रविवारी २० जुलैला कोथरूड, शिवाजीनगर, पौड रस्ता, औंध, कर्वेनगर भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या गळतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे सोमवारी (२१ जुलै) या भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी कळविले आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एसएनडीटी या जलवाहिनीमध्ये गळती होण्यास शनिवारी संध्याकाळ नंतर उघडकीस आले. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत जलवाहिनीतून किती प्रमाणात पाण्याची गळती होत आहे याची पाहणी केली. या गळतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने एसएनडीटी केंद्रासाठी होणारा पाणीपुरवठा महापालिकेच्या वतीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जलवाहिनीतून होत असलेली पाण्याची गळती थांबवण्यासाठी त्याची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी काही प्रमाणात वेळ लागणार असल्याने एसएनडीटी जलशुद्धीकरण केंद्रातून ज्या भागांना पाणीपुरवठा केला जातो. तेथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये संपूर्ण कोथरूड, शिवाजीनगर, औंध तसेच कर्वेनगर येथील काही परिसराचा समावेश आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग : संपूर्ण कोथरूड परिसर, गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदूवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी, विधी महाविद्यालय रस्ता, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांत नगरी, कुलश्री कॉलनी, सहवास, क्षिप्रा, मनमोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, करिश्मा सोसायटी, बंधन सोसायटी परिसर, मयूर कॉलनी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्वे रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुला पर्यंत, एच.ए. कॉलनी परिसर, भरत कुंज, स्वप्नमंदिर परिसर, पटवर्धन बाग, करिश्मा सोसायटी ते वारजे वॉर्ड ऑफीस, चतु:र्श्रुंगी मंदिर, औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, डॉ. आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळ नगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सोसायटी, सिंध सोसायटी परिसर