पुणे : तळजाई टाकीवरून आंबेगाव पठार भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या ६०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या गुरूवारी ( ९ मार्च ) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे आंबेगाव पठार परिसराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी ( १० मार्च ) म्हणजे दुस-या दिवशी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. आंबेगाव पठार सर्वेक्षण क्रमांक १७ ते ४० या भागात गुरूवारी पाणीपुरवठा होणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2023 रोजी प्रकाशित
आंबेगाव पठार परिसराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद
आंबेगाव पठार सर्वेक्षण क्रमांक १७ ते ४० या भागात गुरूवारी पाणीपुरवठा होणार नाही.
Written by लोकसत्ता टीम
पुणे

First published on: 06-03-2023 at 17:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to ambegaon area closed on thursday pune print news apk 13 ysh