पुणे : लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर आणि राजीव गांधी पंपिंग केंद्रात येत्या गुरूवारी (१३ ऑक्टोबर) विद्युत, पंपिंगविषयक तसेच स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्राअंतर्गत येत असलेल्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- स्वायत्ततेसाठी महाविद्यालयांना थेट यूजीसीकडे अर्ज करणे शक्य; यूजीसीकडून नवी नियमावली प्रसिद्ध

पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे

लष्कर जलकेंद्र : संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (काही भाग) संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स.

हेही वाचा- पुणे महापालिकेत निविदा अधिकारांचे विकेंद्रीकरण ; आयुक्त विक्रम कुमार यांचा निर्णय

वडगाव जलकेंद्र परीसर

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to some parts of pune city closed on thursday pune print news dpj
First published on: 10-10-2022 at 21:55 IST