पुणे : पक्षाच्या जन्मापासून कार्यरत आणि आजारी असतानाही गिरीश बापट हे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना आशीर्वाद देण्यासाठी प्रचारात आले तर त्यात गैर काय? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी सोमवारी उपस्थित केला. या घटनेचे विरोधकांनी राजकारण करणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पदयात्रेत पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागले आहेत, असे सांगून मुंडे म्हणाल्या, स्थिर सरकार आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदार भाजपालाच मतदान करेल. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रासने प्रचंड मताधिक्याने विजयी होतील.

हेही वाचा – आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणीस पुढील दोन दिवसांत सुरुवात, आधारकार्डबाबत सूचनांची प्रतीक्षा

हेही वाचा – पुणे : महाविकास आघाडी- शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शहा यांच्या रुपाने राज्याबाहेरचे नेते प्रचारात उतरले आहेत, अशी टीका केली जात आहे. त्याचा समाचार घेताना मुंडे म्हणाल्या, राष्ट्रीय नेत्यावर टीका करणे योग्य नाही. ३७० कलम रद्द केले तेव्हा अमित शहा गृहमंत्री होते. आता पुण्यात प्रचाराला आले तर शहा राज्याबाहेरचे कसे ठरू शकतात?