पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपात जाण्याच्या चर्चेवरून खुलासा केल्यानंतरही खासदार संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांच्याबाबत वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न केला.

माझ्याबाबत पसरविण्यात आलेल्या बातम्यांबाबत मी बोललो आहे. त्यात कोणाचेही नाव घेतलेले नाही, मी आणि माझा पक्ष याबाबत बोललो. त्यामुळे कोणाला लागायचे काहीच कारण नाही. कोण संजय राऊत? असा सवाल करत मी बोलताना कोणाचे नाव घेतलेले नव्हते. तरीदेखील काहीजण अंगावर ओढवून घेतात.

हेही वाचा – “श्री सदस्यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा”, अजित पवार यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्योजक गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली, पवार यांनी अदानी यांची भेट घेतलेली नाही. दोघांची खूप पूर्वीपासून ओळख आहे. हे दोघांनीही लपविलेले नाही. तसेच अदानींवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे अदानी आणि पवार यांच्या भेटीत गैर काहीच नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.