पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. मुंबईहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विमानाने आणि मोटारीने एकत्र प्रवास केला. अंत्यदर्शन घेऊन झाल्यावर दोघेही एकत्रितपणे अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याचे बोलले जात होते. मात्र, देवी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी हे दोघे हॉटेलकडे गेल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा – पुणे : तेरा वर्षांनंतर हळद हसली, हळदीला उच्चांकी १६,५०० रुपये क्विंटल भाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – पुण्यातील ‘हे’ दोन मेट्रो मार्ग पूर्ण, मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता

शहा यांच्या समवेत भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ही भेट राजकीय नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार अधिवेशनासाठी मुंबईला जाणार आहेत.