पिंपरी- चिंचवड: आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये पतीच्या प्रेयसीच पत्नीने अपहरण करून मारहाण केल्याची घटना बुधवारी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात पत्नी, सासू आणि मेहुण्याविरोधात अपहरण झालेल्या महिला प्रेयसीने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पतीच २६ वर्षीय तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. ही बाब पत्नीला कळाल्यानंतर अनेकदा त्यांच्यात वाद झाले. पती प्रेयसीला आणि प्रेयसी पतीला भेटत होती. अखेर बुधवारी साडेपाचच्या सुमारास पतीची प्रेयसी काम करत असलेल्या ऑफिसच्या बाहेर जाऊन तुमचं कुरियर आल आहे. असा फोन करून पतीच्या प्रेयसीला बाहेर बोलावून घेतलं. तिथं त्यांच्यात वाद झाले.
तिथून वाकड पोलीस स्टेशनला चल म्हणून संबंधित प्रेयसीला वाहनात बसून तिला प्रियकराच्या पत्नीने, मेहुण्याने आणि आईने मारहाण केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या पतीसोबत पुन्हा दिसल्यास मी बघून घेईल असा दम देखील महिलेने पतीच्या प्रेयसीला दिला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी संबंधित आरोपींना समज दिली आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.