पुणे : वाकडेवाडी एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने असलेली पिशवी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

(पुणे : फक्त शंभर रूपये न दिल्याने टोळक्याने महाविद्यालयीन तरुणाचा हात मनगटापासून कापला)

(खराडीत कौटुंबिक वादातून जावयाला पेटवले; सासू, सासरे, पत्नीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला कोंढवा भागात राहाते. त्या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी नाशिकला गेल्या होत्या. नाशिकहून एसटी बसने त्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी एसटी स्थानकात आल्या. कोंढव्याला जाण्यासाठी त्या बसची वाट पाहत थांबल्या होत्या. एसटी स्थानकातील बाकावर त्या बसल्या होत्या. त्या वेळी दोन चोरटे तेथे आले. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेशी ओळख केली. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने, तसेच मोबाइल संच असलेली पिशवी लांबविली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस फौजदार कांबळे करत आहेत.