पुण्यातील खराडी परिसरात राहणार्‍या २७ वर्षीय उच्चशिक्षित महिलेने सासरकडील मंडळी आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.मानसी यादव असे २७ वर्षीय आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर (पती) भूपेंद्र मुलायमसिंग यादव वय ३०,मुलायम सिंग यादव (सासरे),राजकुमारी मुलायमसिंग यादव (सासू) आणि शिरीष नरेंद्र शहा (प्रियकर) अशी आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत मानसी यादव हिला एल.एल.बी चे शिक्षण करायचे होते. पण सासू,सासरे आणि पती यांच्याशी तू शिक्षण करू नकोस, म्हणून सतत भांडण होत रहायचे, या त्रासाला कंटाळून ती गावावरून पुण्यात राहण्यास आली.पुण्यात आल्यावर तिने एका कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन घेतले.त्या दरम्यान देखील सासर कडील मंडळी कडून त्रास देणे सुरूच राहिले.पण तिने आपले शिक्षण चालू ठेवले.त्याच दरम्यान तिची शिरीष शहा या तरुणा सोबत ओळख झाली आणि सुरुवातीला मैत्री झाली.त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.


त्यानंतर मयत मानसी आणि शिरीष हे दोघे लिव्ह इन मध्ये राहु लागले.मानसी ही एका ठिकाणी काम करून स्वतःच शिक्षण करीत होती.तर शिरीष हा काहीच काम धंदा करीत नव्हता.तो मानसी कडूनच पैसे घेत असायचा,यावरून दोघांमध्ये देखील अनेक वेळा वाद झाले.एका बाजूला सासरकडील मंडळी तर दुसर्‍या बाजूला प्रियकर या सर्वांच्या त्रासाला कंटाळून मानसी हिने खराडी इथे राहत असलेल्या १० व्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीमधून ५ एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास उडी मारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी मृत घोषित केले.तर या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भूपेंद्र मुलायमसिंग यादव (पती) वय ३०,मुलायम सिंग यादव (सासरे),राजकुमारी मुलायमसिंग यादव (सासू) आणि शिरीष नरेंद्र शहा (प्रियकर) या चौघां विरोधात चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.