चिंताजनक! पुण्यात दिवसभरात ६१७, पिंपरी-चिंचवडमध्ये १९९ करोनाबाधित आढळले

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ६१७, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १९९ करोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंताजनक परिस्थिती बनली आहे. तसेच दिवसभरात पुण्यात पाच तर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या आकडेवारीबरोबर पुण्यात एकूण करोनाबाधितांची संख्या १६ हजार ७४१ वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज अखेर ६१८ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ४८२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९ हजार ९२९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १९९ करोनाबाधित रुग्ण आढळले यांपैकी १२ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर आज उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांचा आकडा २ हजार ९०९ वर पोहचला आहे. यांपैकी १,८८६ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आज प्रथमच मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Worrying 617 were found in pune during the day and 199 corona patients in pimpri chinchwad aau