पुणे : साहित्यरत्न अण्णा भाऊंचे धगधगते जीवन सर्व समाजाला निश्चितच प्रेरणादायी आहे. दुर्दैवाने आपल्याकडे प्रत्येक महापुरुषाला जातीच्या चौकटीत बसवले गेले हे खूपच वेदनादायी आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, अशी भावना लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> मणिपूर महिला अत्याचारप्रकरणी पुण्यात आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा…!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, ललित कला केंद्र, गुरूकुल आणि मिती फिल्म क्लब यांच्यातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार शिंदे यांना  विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते. ललित कला केंद्र गुरूकुलचे संचालक डॉ.प्रविण भोळे, अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे, शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते. याच कार्यक्रमात जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थानाच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल उद्योजक अनिल सौंदडे, प्राचार्य  डॉ.देविदास वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला. शाहीर हेमंतराजे मावळे,लेखिका अमृता खाकुर्डीकर यांनी शिंदे यांची मुलाखत घेतली.

हेही वाचा >>> हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह सहा जणांना अटक, जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला मिळालेला पहिलाच पुरस्कार आहे. हा पुरस्कार शाहीर साबळे यांच्या आठवणींना कृतज्ञतेने समर्पित करत आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने व्यावसायिक यश नक्कीच दिले आहे. पण स्त्रीप्रधान चित्रपट करताना मी माझ्या आईची प्रतिक्रिया काय असेल, याचा नेहमी विचार करतो. त्याबाबत आईच ‘आयकॉन’ आहे, असे शिंदे यांनी सांगितले.