scorecardresearch

पुणे: व्याजाने दिलेले पैसे परत करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या; हडपसरमधील घटना

जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली.

suicide case
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: व्याजाने दिलेले पैसे परत करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

वैभव प्रकाश सूर्यवंशी (वय ३६, रा. सहजीवन सोसायटी, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. वैभव यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन अतुल बाबासाहेब सूर्यवंशी (वय ३५, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव याची पत्नी स्नेहल (वय ३०) हिने या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा- पुणे : मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी अंगलट; तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

वैभव याने शेअर बाजारात पैसे गुंतवणुकीसाठी आरोपी अतुल याच्याकडून दोन वर्षांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. आर्थिक व्यवहारातून अतुलने वैभवला धमकावण्यास सुरुवात केली होती. अतुलने त्याला मारहाण केली होती. अतुलने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. अतुलने दिलेल्या धमकीमुळे वैभव घाबरला होता. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. वैभवने राहत्या घरात गळफास आत्महत्या केली. वैभवच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अतुल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 15:37 IST

संबंधित बातम्या