लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : धनकवडीत वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सागर भाऊशेठ सोनवणे (वय ३८, रा. नटराज सोसायटी, धनकवडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साई मंगेश नार्वेकर (वय २०), श्रृती मंगेश नार्वेकर (वय २२), मंजिरी मंगेश नार्वेकर (वय ५०, तिघे रा. नटराज सोसायटी, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

आणखी वाचा-मराठा समाजाच्या आंदोलनाचा धसका; माळेगाव सहकारी कारखान्याच्या कार्यक्रमापासून अजित पवार दूरच

सोनवणे यांनी या संदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनवणे आणि नार्वेकर कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता. आरोपी मंगेश आणि परिसरातील रहिवासी वैभव डेरे यांचे भांडण झाले. भांडणात सोनवणे यांनी मध्यस्थी केली. त्या वेळी मंगेशने सोनवणे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यानंतर सोनवणे यांची पत्नी आणि बहिणीने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी आरोपी श्रृती आणि तिची आई मंजिरी यांनी सोनवणे यांची पत्नी आणि बहिणीला मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक पोठरे तपास करत आहेत.