पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत न दिल्याने चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. भेकराईनगर येथील आयबीएम कंपनीजवळ मंगळवारी (१९ जुलै) रात्री हा प्रकार घडला.याप्रकरणी अभिषेक विजय पवार (वय २२, रा. अंजना अपार्टमेंट, भेकराईनगर, फुरसुंगी) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर हेगडे (रा. फुरसुंगी), मयुर पडवळ (रा. चाकण), पंकज पांचाळ (रा. भेकराईनगर) आणि अमित अवचरे (रा. फुरसुंगी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा : दारू पिताना चखणा आणून दिला नाही म्हणून बहिण-भावाला बेदम मारहाण ; कल्याणमधील तरुणांची अरेरावी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक पवार याच्याकडे काहीजणांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी पैसे दिले होते. ते तो परत करत नव्हता. अभिषेक हा वैष्णव पाडुळे या मित्रासमवेत मंगळवारी रात्री घरी चालला असताना भेकराईनगर परिसरात चौघांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली. यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.