पिंपरी : त्वरित कर्ज या उपयोजनवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि बहिणीला फोन करून अपहरण झाल्याचे सांगत पाच लाखांची मागणी केली. याबाबत बहिणीने पोलिसांना कळविल्यानंतर अवघ्या एका तासात प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तरूणाचा बनाव उघडकीस आणून त्याला ताब्यात घेतले.

विराज विकास देशपांडे (वय २६, रा. वाघोली) असे बनाव रचलेल्या तरुणाचे नाव आहे. ८ फेब्रुवारी रोजी पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षात वृंदा हिरळकर यांचा फोन आला. आपला भाऊ विराजचे दिघी परिसरातून सायंकाळी साडेसहा वाजता तिघांनी अपहरण केले. अपहरणकर्ते पाच लाख रुपये खंडणी मागत असून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. नियंत्रण कक्षातून याबाबत दिघी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट तीन यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी फोन केलेल्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन शोध सुरू केला.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Pune, man theft, theft in Neighbor house,
पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

हेही वाचा – बनावट खात्यांवर सीबीएसई करणार कारवाई, स्पष्ट शब्दांत दिला इशारा

हेही वाचा – पुणे: पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारचे फेब्रुवारीतच ‘एप्रिल फूल’

विराजला पोलिसांनी खराडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे घटनेबाबात चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवाडवीची उत्तरे दिली. कोठून अपहरण केले अशी विचारणा केली असता त्याने प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती दिली. घटनास्थळावर नेले असता त्याने माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की त्वरित कर्ज उपलब्ध (इन्स्टंट कॅश) या उपयोजनवरुन कर्ज घेतले. कंपनीचे लोक कर्जासाठी वारंवार फोन करुन पैसे परत देण्यासाठी विचारणा करत होते. त्यांचे पैसे परत देण्यासाठी एकत्रित मोठी रक्कम मिळावी यासाठी अपहरणाचा बनावट फोन केल्याचे सांगितले.