पुणे : ‘कॅशबॅक’च्या लाभापोटी एका युवकाने पावणेदोन लाख गमावले. पैसे तर मिळाले नाहीच, पण त्याच्या बँक खात्यातून एक लाख ८८ हजार रुपये सायबर चोरट्यांनी लंपास केले.

याप्रकरणी, शिवणे येथील ३३ वर्षीय तरुणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

हेही वाचा – पुण्यात भरदिवसा मोबाइल हिसकावून चोरणारा कर्नाटकमधील चोरटा गजाआड; साथीदार फरार

हेही वाचा – कसब्याची पुनरावृत्ती कोथरूडमध्ये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा शेअर मार्केटमध्ये ट्रेडींगचे काम करतो. त्याच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी कॅशबॅकची ऑफर असल्याचा संदेश पाठवून एक दुवाही (लिंक) पाठविला. बँकेकडून संदेश आला आहे असे समजून तरुणाने त्या लिंकवर क्लिक केले. त्याचवेळी सायबर चोरट्याने त्या लिंकच्या माध्यमातून फिर्यादीच्या बँक खात्याचा ताबा आपल्याकडे घेऊन पैसे काढून घेतले. पैसे कमी झाल्याचा संदेश येताच तरुणाने सायबर पोलिसांकडे याबात तक्रार दिली होती. त्यानुसार उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.