सक्षम आणि दांडगा जनसंपर्क असलेला उमेदवार कसब्यात नसल्याने पोटनिवडणुकीत पराभव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून कसब्याची पुनरावृत्ती कोथरूडमध्ये होऊ नये, यासाठी विचार सुरू झाला आहे. त्यातच आता कोथरूडमधील उमेदवार बदलण्याची मागणीही कार्यकर्त्यांकडून आणि समाजमाध्यमातून जोर धरू लागली आहे. कोथरूडमध्ये उमेदवार बदलला नाही तर कोथरूडचा कसबा होईल, अशी चर्चा होत आहे.

हेही वाचा- बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली? दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

ubt shiv sena leader jyoti thackeray in yavatmal washim constituency tour
मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Hitendra Thakur, left, support from the left,
डाव्यांची साथ नसल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसणार ?
arjun modhvadiya
गुजरातमध्ये विक्रमी मताधिक्याचा भाजपचा प्रयत्न

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव सक्षम उमेदवार नसल्याने झाल्याची अप्रत्यक्ष कबुुली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. भाजपच्याच आयटी सेलनेही कसब्यातील विजय हा काँग्रेसचा नाही तर तळागाळात काम करणा-या कार्यकर्त्याचा आहे, असे सूचित केले आहे. त्यामुळे रासने तळागाळात काम करणारे कार्यकर्ते नव्हते, असा संदेश यातून पुढे येत आहे. हाच धागा पकडून कोथरूडमध्ये बदल करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा- पुणे : वन कर्मचऱ्यांना मारहाण प्रकरणी दोघांना शिक्षा

कसब्याप्रमाणेच कोथरूड भाजपचा बालेकिल्ला आहे. ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सुरक्षित मतदार संघ असल्यानेच त्यांना या मतदार संघातून उमेदवारी देण्याचे तीव्र पडसाद कोथरूडमध्ये उमटले होते. मात्र अखेरच्या क्षणी नेत्यांमधील नाराजी दूर करण्यात आली. मात्र भाजपचा बालेकिल्ला असूनही कमी मताधिक्याने चंद्रकांत पाटील यांना विजय मिळविता आला.

हेही वाचा- “आता माझी पाळी आली, सगळ्यांना व्यवस्थित…”, रवींद्र धंगेकरांचा राजकीय विरोधकांना सूचक इशारा; म्हणाले, “गुडघे टेकायला…!”

पोटनिवडणुकीतील दारूण पराभवाचे तीव्र पडसाद भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात उमटण्यास सुरूवात झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाबाबत नाराजी आहे. त्याची जाहीर आणि दबक्या आवाजातही चर्चा कार्यकर्ते करत आहे. कसब्यात उमेवार लादल्याने पराभव पत्करावा लागला आता पुन्हा कोथरूडमध्ये लादू नका, अशी भावना व्यक्त केली जात आहे.