पुणे : गणेशोत्सवातील वर्गणी गोळा करणाऱ्या दोघांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी एकाला दोषी ठरवून पाच लाख रुपयांचा दंड, तसेच दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवडमध्ये वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याना पकडले; सर्वाधिक बांगलादेशी भोसरीमध्ये!

जीवन सुरेश पवार (वय २०, रा. भिकोबा मोरे चाळ, सदगुरू कृपा हाईट्स, उत्तमनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत रामचंद्र मोरे (वय ४४, प्रचिती अपार्टमेंट, कीर्ती नगर, वडगाव बुद्रुक) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी आरोपी पवार, तसेच त्याच्या अल्पवयीन भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवणे परिसरात एक सप्टेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती. मोरे हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा शिवणे परिसरात मोारे यांच्याकडून गृहप्रकल्प बांधणीचे काम सुरू होते. या भागातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोरे यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी आले होते. वर्गणीवरु मोरे आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

हेही वाचा >>> बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी मोरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले, तसेच त्यांना दगडाने मारहाण केली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मोरे हे गंभीर जखमी झाले होते. या खटल्यात सरकार पक्षाकडून ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदरे, पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे , सहायक पोलिस निरीक्षक चवरे, हवालदार विनायक करंजावणे, प्रियांका रासकर यांनी खटल्याच्या कामकाजात सहाय केले. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आराेपी पवारला दोषी ठरवून पाच लाख रुपये दंड आाणि दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.