scorecardresearch

पुणे : शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण

पवित्र संकेतस्थळाद्वारे नियुक्ती झालेल्या शिक्षकांची नोकरी कायम राहणार आहे.

पुणे : शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण
फोटो-लोकसत्ता संग्रहित छायाचित्र

शिक्षण सेवकांचा कालावधी संपत आलेल्या १७० जणांच्या कागदपत्रांची जिल्हा परिषदेकडून छाननी पूर्ण झाली आहे. मात्र यामधील ११ शिक्षण सेवक गैरहजर राहिले आहेत. या कागदपत्र छाननीला सोमवारी सुरुवात झाली होती. त्याचा अहवाल १२ डिसेंबरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या टीईटी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या जिल्ह्यातील १७० शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली होती. १७० मध्ये आणखी ११ शिक्षकांची भर पडली असून ही संख्या आता १८१ वर पोहोचली आहे. मात्र, पूर्वीच्या १७० पैकी ११ शिक्षक प्रमाणपत्र सादर करण्यास उपस्थित राहिले नाहीत. पवित्र संकेतस्थळाद्वारे नियुक्ती झालेल्या शिक्षकांची नोकरी कायम राहणार आहे.

हेही वाचा >>>पुणे : १८ ते १९ वयोगटातील सुमारे ९० टक्के तरुणांची मतदार नोंदणी नाही; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

पुणे जिल्हा परिषदेने टीईटी घोटाळ्याशी संबंधित आणि तीन वर्षाचा नियमित शिक्षण सेवकांचा कालावधी संपलेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी केली आहे. टीईटी घोटाळा उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घोटाळ्यात अनेकांनी बनावट प्रमाणपत्रे सादर करून ही परीक्षा उत्तीर्ण करत नोकरी मिळवली होती. राज्य परीक्षा विभागाने आठ हजार विद्यार्थ्याची यादी प्रसिद्ध केली होती. यातील पुण्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवक, उपशिक्षक असणाऱ्या शिक्षकांची यादी शिक्षण विभागाला मिळाली असून या शिक्षण सेवकांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 11:25 IST

संबंधित बातम्या