22 July 2019

News Flash

न्यारी  न्याहारी : ओट्सची भेळ

आता या मिश्रणात भेळेची हिरवी चटणी, गूळ-खजुराची चटणी, चाट मसाला मिसळा.

(संग्रहित छायाचित्र)

साहित्य – ओट्स, शेव, उकडलेले मूग, शेंगदाणे, चणे, मक्याचे दाणे, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, कांदा, हिरवी चटणी, गूळ-खजुराची चटणी, चाट मसाला, लिंबू

कृती – ओट्स कोरडे भाजून घ्या. त्यात शेव, उकडलेले मूग / शेंगदाणे / चणे / मक्याचे दाणे, उकडून कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, कांदा घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता या मिश्रणात भेळेची हिरवी चटणी, गूळ-खजुराची चटणी, चाट मसाला मिसळा. मस्तपैकी लिंबू पिळून घ्या. ही चटपटीत भेळ लगेच फस्त करा.  जर चटण्या नसतील किंवा उकडलेले शेंगदाणे, मक्याचे दाणे नसतील तरी हरकत नाही. चाट मसाला, बटाटा आणि कांदा, कोथिंबीर घालून सुकी भेळही तयार होऊ शकते. फक्त ही भेळ तयार केल्यावर लगेचच खा. जास्त वेळ ठेवण्यात मजा नाही.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on August 23, 2018 2:36 am

Web Title: article about oats bhel recipe