ब्रोकोली सेलेरी सूप साहित्य * अर्धा किलो ब्रोकोली * सेलेरीच्या ४-५ काडय़ा * १ मोठा कांदा * ३० ग्रॅम बटर * २ चमचे मीठ * १ चमचा काळी मिरी, पाऊण कप पाणी कृती * ब्रोकोली आणि सेलेरी धुऊन चिरून घ्या. * पातेल्यात पाणी उकळून त्यात ब्रोकोली आणि सेलेरी उकळून घ्या. यातच मीठ आणि काळी मिरीही उकळा. * एका पसरट पातेल्यामध्ये बटर वितळवून घ्या. कांदा बारीक चिरा आणि ३-४ मिनिटे या बटरमध्ये परता. * आता बटरवर ब्रोकोली आणि सेलेरीचे मिश्रण ओता. नीट मिसळून शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून ते वाटून घ्या. * पुन्हा एकदा पातेल्यात घालून गरम करून प्या किंवा थंडच सव्र्ह करा.