X

सकस सूप : व्हेज क्लियर सूप

कांदा आणि गाजर बारीक चिरून घ्या. सेलेरीची पानेसुद्धा बारीक चिरा. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्या किंवा बारीक तुकडे करा.

साहित्य

कांदा २०० ग्रॅम, गाजर २५० ग्रॅम, १ सेलेरीची काडी, ४-५ पाकळ्या लसूण, १०० ग्रॅम मशरूम, १ चमचा मीठ, १ चमचा मिरपूड, थोडेसे तेल.

कृती

कांदा आणि गाजर बारीक चिरून घ्या. सेलेरीची पानेसुद्धा बारीक चिरा. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्या किंवा बारीक तुकडे करा. भांडय़ात अगदी कमी तेलावर कांदा परतून घ्या. लालसर झाल्यावर त्यात गाजर, सेलेरी घालून परता. यानंतर त्यात लसूण आणि पाणी घाला. हे मिश्रण चांगली उकळी येईपर्यंत शिजवा. मऊशार झाल्यावर गॅस बंद करा. नंतर त्यात मीठ, मिरेपूड घाला. हे सूप गाळून घ्या. आता एका नव्या भांडय़ात पाणी उकळायला ठेवा. त्यात मशरूम धुऊन चिरून घाला आणि त्याला एक उकळी काढा. मशरूम शिजल्यावर तेही गाळून सूपमध्ये घाला.

गाळलेले हे गरमागरम सूप खवय्यांसमोर पेश करा.