सणासुदीनिमित्त अनेकांच्या घरी विविध गोड पदार्थ बनवले जातात. यात विशेषत: शिरा, गुलाब जाम, रसगुल्ला, पुरळ पोळी हे पदार्थ बनवले जातात. पण ज्यांना नेहमी काहीतरी वेगळं खायला आवडतं विशेषत: गोड पदार्थ आवडतात त्याच्यासाठी आम्ही खमंग असा बदामाचा हलवा कसा करायचा, याविषयी सांगणार आहोत. बदामाचा हलवा खाण्यास अतिशय चविष्ठ लागतो. यात बदाम सोलून त्याची पेस्ट करुन तुपात भाजली जाते. विशेषत: हिवाळ्यात तुम्ही बदामाचा हलवा नक्की ट्राय करु शकता.

साहित्य

१) दीड कप बदाम ( सहा ते सात तास पाण्यात भिजवून घ्या)

२) १ कप तूप

३) १ कप साखर

४) १ कप दूध

५) अर्धा चमचा वेलची पूड

बदाम हलवा बनवण्याची कृती

सर्वप्रथम बदाम पाण्यातून काढून सोलून घ्या. यानंतर बदामाची पेस्ट बनवण्यासाठी त्यांना ब्लेंडरमध्ये टाका आणि खडबडीत पेस्ट बनवा. आता कढईत तूप गरम करा आणि त्यात बदामाची पेस्ट घाला. ही पेस्ट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. यानंतर कढईत साखरेसह दूध घाला आणि सुमारे १० मिनिटे शिजवा. आता वेलची पूड मिक्स करा. अशाप्रकारे बदामाचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही यात काजू पेस्टही मिक्स करु शकता. याशिवाय हलवा अधिक चांगला करण्यासाठी त्यात ड्राय फ्रूट्सही घालू शकता.