Bajra Masala Puri : पुरी हा प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. पालक पुरी, मेथी पुरी तुम्ही अनेकदा खाल्ल्या असतील पण तुम्ही कधी बाजरीची पुरी खाल्ली आहे का? हो, बाजरीची पुरी. बाजरीची पुरी चवीला अप्रतिम वाटते. कुरकुरीत अशी बाजरीची पुरी अत्यंत पौष्टिक असून कोणालाही आवडेल. जर तुमची मुले बाजरीची भाकरी खात नसेल तर तुम्ही बाजरीची मसाला पुरी हा एक चांगला पर्याय आहे. सकाळचा नाश्तात तुम्ही पुरी खाऊ शकता. विशेष म्हणजे ही पुरी तुम्ही एकदा बनवली तर दोन ते तीन दिवस खाऊ शकता. ही मसाला पुरी कशी बनवायची, चला तर जाणून घेऊ या.

साहित्य

  • बाजरीचे पीठ
  • मीठ
  • हळद
  • तिळ
  • बेसन
  • हिंग
  • तेल
  • कोथिंबीर
  • ताजी मेथी/कसुरी मेथी
  • ओवा
  • जिरे
  • धने
  • लसूण
  • हिरवे मिरचे
  • बेसन
  • तेल

हेही वाचा : Onion Flower Fritters : कांद्याच्या पातीची भजी कधी खाल्ली आहेत का? नसेल तर नक्की करून पाहा ही रेसिपी

maharashtrian bhakri recipe easy masala bhakri recipe in marathi
नाचणी-तांदळाची भाकरी नेहमीच खातो, खाऊन पाहा ज्वारीची ‘मसाला भाकरी’; ही घ्या सोपी रेसिपी
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
how to plant flower plant it garden
Gardening tips : उन्हाळ्यातही सदा बहरलेली राहील सदाफुली! रंगीबेरंगी फुलांसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स
Masala Dhemse Bhaji Recipe In Marathi
भूक नसतानाही खावीशी वाटेल असे झणझणीत मसाला ढेमसे; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

कृती

  • दोन कप बाजरीचे पीठ घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घाला
  • पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घाला
  • त्यानंतर एक मोठा चमचा तिळ घाला.
  • एक मोठा चमचा बेसन घाला.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर त्यात एक चमचा तेल घाला.
  • पाणी घालण्यापूर्वी तेल पीठाबरोबर चुळून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
  • पाव कप मेथी घाला.ताजी मेथी किंवा कसुरी मेथी घाला (आवडत असेल तर)
  • एक वाटण तयार करा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घ्या
  • त्यानंतर त्यात एक मोठा चमचा धने घ्या. त्यात लसूण टाका. हिरवे मिरचे टाका
  • पाणी घालून सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा.
  • याची पेस्ट पुरीच्या पीठामध्ये टाका.
  • त्यानंतर पाणी घालून पीठ भिजवून घ्या
  • पीठ नीट मळून घ्या.
  • त्यानंतर दहा मिनिटे हे पीठ झाकून घ्या.
  • त्यानंतर या पीठापासून पुऱ्या लाटून घ्या
  • गॅसवर कढई ठेवा आणि तेल गरम करा.
  • गरम तेलात मंद आचेवर पुऱ्या तळून घ्या.
  • बाजरीची खमंग मसाला पुरी तयार होईल.
  • ही पुरी ३-४ दिवस टिकणारी आहे.
  • आवडत्या चटणीबरोबर तुम्ही पुरी खाऊ शकता.