Bajrichi Khichdi  : खिचडी हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. लहान मुलांसाठी आवर्जून पौष्टिक खिचडी बनवली जाते. तुम्ही तांदूळ आणि डाळ घालून अनेकदा खिचडी बनवली असेल पण हिवाळ्यात आरोग्यास फायदेशीर असणारी बाजरीची खिचडी बनवली आहे का? हिवाळ्यात तज्ज्ञांकडून बाजरी खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही बाजरीची भाकरी खाऊन कंटाळले असाल तर पौष्टिक बाजरीची खिचडी बनवा. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य :

  • बाजरी
  • मूग डाळ
  • जिरे
  • कढीपत्ता
  • हिरव्या मिरच्या
  • हिंग
  • हळद
  • मीठ
  • तूप
  • लसूण

हेही वाचा : फक्त दहा मिनिटांमध्ये असे बनवा पौष्टिक गव्हाच्या पीठाचे धिरडे, लगेच रेसिपी नोट करा

Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
तांदळाचे बोर
दिवाळी स्पेशल फराळ! ‘या’ दिवाळीत बनवा हटके पदार्थ, जाणून घ्या कसे बनवावे तांदळाचे बोर
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
sugar workers salary
कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू

कृती :

  • सुरुवातीला बाजरीचे भरड दळून आणा.
  • बाजरीच्या भरडीमध्ये पाणी घाला आणि भूसा आणि सालं वेगळी करा.
  • दुसऱ्या भांड्यामध्ये मूग डाळ पाण्यात भिजवा.
  • एका कढईत तूप गरम करा
  • त्यात बारीक चिरलेले लसूण, जिरे, हिंग, कढी पत्ता, आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या.
  • हळद आणि चवीनुसार मीठ टाका.
  • त्यात बाजरीची बाजरीची भरड घाला आणि चांगले परतून घ्या.
  • पाणी टाकून बाजरीची भरड चांगली शिजू द्या
  • त्यानंतर त्यात भिजवलेली मूग डाळ टाका आणि आणखी एक ग्लास पाणी घालून पुन्हा शिजवा.
  • कोथिंबीर घालून गरमा गरम बाजरीची खिचडी सर्व्ह करा.
  • तुम्ही ही खिचडी कुकरमध्ये सुद्धा करू शकता.