पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहासोबतच आवर्जुन खावासा पदार्थ म्हणजे भुट्टा…. म्हणजेच, मक्याचं कणीस. अनेकदा पावसाळ्यामध्ये गरमा-गरम टेस्टी, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. पण या वातावरणामध्ये बॅक्टेरियांची भितीही फार असते. त्यामुळे स्ट्रिट फूडपासून दूर राहण्याचा सल्ला अनेकदा आपल्याला देण्यात येतो. पण अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. जी तुमची चमचमीत खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. चला तर मग पावसाळ्यात एन्जॉय गरमागरम तंदुरी भुट्टा; एकदा खाल तर खातच रहाल..

तंदुरी भुट्टा साहित्य

  • २ कणीस
  • १ वाटी दही, मीठ, लिंबू
  • मीरपूड, १ चमचा तिखट,
  • जीरे पूड आणि आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर, बटर

तंदुरी भुट्टा कृती –

  • साधारण १ वाटी दही घेऊन ते चांगले फेटायचे. त्यामध्ये मीठ, मीरपूड, १ चमचा तिखट, जीरे पूड आणि आलं लसूण पेस्ट घालून हे चांगलं एकजीव करुन घ्यायचे.
  • बाजारात मिळणारे ताजे २ कणीस घेऊन त्याची वरची साले आणि दशा काढून ही कणसं साधारण ७० टक्के उकडून घ्यायची.
  • त्यानंतर या उकडलेल्या कणसांवर दह्याचे केलेले मिश्रण सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचे आणि हे कणीस गॅसवर चांगले भाजून घ्यायचे.
  • या भाजलेल्या गरम कणसावर चाट मसाला किंवा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि फ्लेवर येण्यासाठी बटर लावायचे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – पावसाळ्यातील भन्नाट स्नॅक्स; तयार करा गव्हाच्या पीठाचे पौष्टिक लाडू

  • असे वेगवेगळे सोपस्कार केलेले हे कणीस चवीला थोडे स्मोकी आणि चविष्ट अतिशय छान लागते.
  • मॅग्नेशियम, लोह, कॉपर, विटामिन बी, फॉस्फरस असे अनेक घटक स्वीटकॉर्नमधून मिळतात.