दीपा पाटील
साहित्य
* पाच ओले बोंबिल
* एक ते दीड चमचा लसूण-आले
* १५ लसणांच्या पाकळ्या
* ७० ग्रॅम चणापीठ (बेसन)
* २० ग्रॅम तांदळाचे पीठ
* मीठ चवीपुरते
* दोन चमचा लाल तिखट
* बारीक चिरलेली कोथिंबीर
* चिमूटभर सोडा
* चिमूटभर हिंग ल्ल अर्धा चमचा हळद
* तेल तळण्यापुरते
कृती
बोंबलाचा मधला काटा काढून त्याचे चौकोनी तुकडे करावे. त्यास आले लसूण, मिरची पेस्ट आणि मीठ सर्वत्र लावावे. बेसनमध्ये तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, सोडा आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करावे आणि भजीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे आणि त्यात बोंबलाचे तुकडे बुडवून फ्राय करून घ्यावे आणि चटणीबरोबर सव्र्ह करावे.