शेफ नीलेश लिमये

साहित्य

१ वाटी बो-टाय पास्ता (टायचा बो अर्थात गाठीप्रमाणे आकार असलेला पास्ता),

१०० ग्रॅम बोनलेस चिकन, ३ ब्रेड स्लाइस, ४-५ लसूण पाकळ्या, ५० ग्रॅम ऑलिव्ह तेल, १०० ग्रॅम प्रोसेस्ड चीझ, २ अंडय़ांचे पिवळे बलक, मीठ चवीनुसार, ८-१० लेटय़ुसची पाने, हवे असल्यास चिली फ्लेक्स.

कृती :

सगळ्यात आधी पास्ता मिठाच्या उकळत्या पाण्यातून उकडून घ्या. बो टाय पास्ता मिळाला नाही किंवा आवडत नसेल तर मॅक्रोनी किंवा तुमच्या आवडीचा पास्ता घेता येईल. पास्ता उकडल्यावर लगेचच पाण्याखाली गार करा आणि थोडं तेल लावून फ्रिजमध्ये ठेवा. लसणीचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.  चिकनला मीठ, मिरपूड लावून पॅनमध्ये थोडय़ाशा ऑलिव्ह तेलात शिजवून घ्या. ब्रेड स्लाइसचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून ते पॅनमध्ये भाजून घ्या. यात थोडंसं तेल आणि लसूण घालून त्याला छान लसणीचा स्वाद येऊ द्या. चीझ किसून ठेवा. अंडय़ाचे पिवळे बलक चांगले लुसलुशीत होईपर्यंत फेटून घ्या. त्यात चीझ घाला आणि थोडंसं ऑलिव्ह तेल घाला. मिश्रण फेटून घ्या.

एका बाउलमध्ये लेटय़ुसची पाने, पास्ता, चिकन आणि ब्रेडचे तुकडे एकत्र टॉस करा. त्यावर बनवलेले चीझ आणि अंडय़ाचे ड्रेसिंग वाढा. आता हे सॅलड थंड करून पेश करा