Healthy Breakfast : नाश्त्यात पौष्टिक काय खावं? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. पोहे, इडली, उपमा, डोसा या सारखे पदार्थ आपण नेहमी खातो. तुम्ही सुद्धा नेहमी नेहमी हे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर तु्म्ही एक वेगळा आणि हटके असा पौष्टिक नाश्ता बनवू शकता. रात्रभर भिजवलेल्या चण्यापासून तुम्ही अप्रतिम असा नाश्ता बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडू शकतो. पौष्टिक नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.हा नाश्ता कसा बनवायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. ही रेसिपी फॉलो करा.

साहित्य

  • हिरवे मिरचे
  • बटाटा
  • रात्रभर पाण्यात भिजवलेले चणे
  • लसूण
  • जिरे
  • लाल तिखट
  • मीठ
  • पाणी
  • हळद
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • हिंग
  • तेल

हेही वाचा :Breakfast Recipe : फक्त दहा मिनिटांमध्ये बनवा कॉर्न पोहे, नोट करा ही सोपी रेसिपी

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

कृती

  • सुरुवातीला चणे, हिरवे मिरचे आणि लसूण घ्या.
  • त्यात हळद, जिरे, मीठ, लाल तिखट आणि पाणी घाला
  • हे मिश्रण जाडसर असे मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • त्यात एक बटाटा घ्या आणि सोलून घ्या
  • हा बटाटा किसून घ्या.
  • बटाटा किसून झाल्यानंतर त्यात पाणी घाला आणि बटाट्याचा किस धुवून घ्या.
  • स्वच्छ धुतलेला बटाट्याचा किस चण्याच्या जाडसर मिश्रणामध्ये एकत्र करा.
  • मिश्रिण एकजीव केलयानंतर त्यामध्ये थोडे तेल घाला.
  • त्यानंतर आवडीप्रमाणे हिंग घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाका.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर एका परातीला तेल लावा आणि हे मिश्रण त्यात पसरवून घ्या.
  • त्यानंतर गॅसवर एका कढईत पाणी ठेवा आणि या कढईवर ही परात ठेवा.
  • परातीवर झाकून घ्या. त्यानंतर पाच ते सात मिनिटानंतर हे मिश्रण वाफेवर शिजलेले दिसून येईल.
  • त्यानंतर हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या आणि त्यानंतर या मिश्रणाच्या नीट वड्या पाडा.
  • त्यानंतर गॅसवर तवा ठेवा. त्यावर थोडे तेल गरम करा.
  • त्यात मोहरी टाका.
  • त्यानंतर या वड्या या तेलाच्या मदतीने दोन्ही बाजूने थोड्या थोड्या भाजून घ्यायच्या आहे.
  • पौष्टिक आणि कमी तेलामध्ये केलेला नाश्ता तयार आहे
  • हा नाश्ता तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.