नीलेश लिमये

ही एक जपानी डिश आहे. खूप लोकप्रिय. तेरियाकी सॉस बनविण्यास खूप सोपा आहे. हा सॉस चिकनऐवजी मशरूम, पनीर वा कोळंबीसोबत खाता येतो.

साहित्य :

५० मिली सोया सॉस

३० ग्राम ब्राऊन शुगर

१०० मिली राइस वाइन व्हिनेगर

२ टी स्पून कॉर्न स्टार्च पाण्यात पेस्ट बनवून ठेवा

४०० ग्रॅम चिकन (बोनलेस)

२०० ग्रॅम ब्रोकोली

कांद्याची पात, मीठ मिरपूड

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिकन साफ करून छोटे क्यूब कापून घ्या. ब्रोकोली पाण्यातून ब्लांच करा. कांद्याची पात कापा. सॉसचे सर्व साहित्य एका बाऊलमध्ये ढवळून घ्या. पॅन गरम करा, तेल टाकून चिकन आणि ब्रोकोली टॉस करा. त्यात सॉसचे सर्व साहित्य मिश्रण करून टॉस करा. त्यात कांद्याची पात घाला. प्लॅटरवर सव्‍‌र्ह करा वा फ्राइड राइससोबत सव्‍‌र्ह करा.