सध्याच्या डिजीटल जमान्यतील बदलत्या जीवन शैलीमुळे अनेकांना वेळेवर नाश्ता आणि जेवण करता येत नाही. शिवाय अनेकजण गडबडीत कुठेतकरी फास्टफूडच्या गाड्यावर नाष्टा करतात. त्यामुळे शरीराला योग्य ती आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत. ज्यामुळे आपणाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. जी बनवायला सोप्पी तर आहेच शिवाय ती शरीरासाठी चांगली आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी उपमा खाल्ला असेल पण आता बाहेरचा उपमा खाण्यापेक्षा घरामध्येच चविष्ट ज्वारीचा उपमा कसा बनवायचा ते जाणून घ्या.

ज्वारीचा उपमा करण्यासाठी लागणारे साहित्य पुढीप्रमाणे –

साहित्य –

  • ज्वारीचा रवा १ कप
  • हरभरा डाळ १ चमचा, उडीद डाळ १ चमचा, शेंगदाणे अर्धी वाटी, मोहरी १ चमचा, जिरे १ चमचा
  • पाणी ३ कप
  • लिंबू १, चिरलेले टोमॅटो अर्धी वाटी, चिरलेला कांदा अर्धी वाटी, चिरलेल्या हिरव्या मिरच्या ४, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल २ चमचे
  • आवश्यकतेनुसार मीठ

कृती-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील साहित्य घेतल्यानंतर ज्वारीचा रवा प्रथम चाळून घ्या आणि तो तांबूस होईपर्यंत भाजा. त्यानंतर कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घ्या. गरम तेलामध्ये मोहरी, हरभरा डाळ, उडीद डाळ, जिरे, हिरवी मिरची, शेंगदाणे, टोमॅटो, कढीपत्ता टाकून परता. नंतर त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून उकळी येऊ द्या. उकळलेल्या मिश्रणात भाजलेला रवा हळूहळू घालून मिश्रण एकजीव करा व मंद गॅसवर १५-२० मिनिटे शिजवा. उपमा तयार झाल्यावर गरम असताना त्यावर कोथिंबीर घाला आणि लिंबाच्या फोडीसह सर्व्ह करा. या पद्धतीने तुम्ही घरचा घरी ज्वारीचा उपमा बनवू शकता.