धिरडे हा पदार्थ तुम्ही नेहमी खात असाल. झटपट तयार होणारा, स्वादिष्ट आणि हेल्दी असा हा पदार्थ आहे. त्याला काही जण बेसन पोळी देखील म्हणतात. तुम्ही बेसन पोळी म्हणा किंवा डाळीचे धिरडे म्हणा ते कुरकुरीत असेल तर ते खाण्याची मज्जा दुपट्ट होते. आमच्याकडे धिरडे कुरकुरीत करण्यासाठी एक सोपा उपाय आहे तुम्हाला फक्त १ चमचा तांदळाचे पीठ मिश्रणात टाकायचे आहे. चांगले खरपूस भाजले की कुरकुरीत डाळीचे धिरडे तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या सोपी रेसिपी
हेही वाचा – Weekend Special: आता घरीच बनवा केटो स्टाइल चिकन लॉलीपॉप! झटपट होईल तयार, सोपी आहे रेसिपी
साहित्य – डाअळीचे पीठ ३ चमचे, तांदळाचे पीठ १ चमचा, ओवा, कांदा, टोमॅटो बारीक चिरून, कोथिबीर, मीठ,तिखट, पाणी
कृती– दोन्ही पिठे एकत्र करून, त्यात तिखट, मीठ, ओवा, कांदा, टोमॅटो, कोथिबीर बारीक चिरून घाला. यामध्ये पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घाला. गरम तव्यावर १ चमचा तेलावर नेहमीप्रमाणे धिरडे घाला, कोथिंबिरीच्या हिरव्या चटणीसोबत वाढा.