Weekend Special Recipe : वीकेंड आला की चमचमीत खावे, असे वाटते पण नेमकं खायला हटके काय बनवावं हे कळत नाही. अनेक जण वीकेंड आला की इडली, डोसा, ढोकळा बनवतात किंवा काही जण भजी, वडा, कटलेट सारखे पदार्थ बनवतात. पण नेहमी नेहमी तेच तेच खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही एक हटके पदार्थ करू शकता. तुम्ही ब्रेड पकोडे बनवू शकता. भज्यांप्रमाणे कुरकुरीत ब्रेड पकोडे चवीला अप्रतिम वाटतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे ब्रेड पकोडे आवडतील. खरं तर ब्रेड पकोडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात पण आज आपण भज्यांप्रमाणे ही पकोडे बनवणार आहोत. तुम्ही हे पकोडे एकदा खाल तर कुरकुरीत कांदा भजीला विसराल. हे ब्रेड पकोडे कसे बनवायचे, याविषयी जाणून घ्यायचे असेल तर ही रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य

  • ब्रेड स्लाइस
  • कांदा
  • मिरची
  • बटाटा
  • आलं लसणाची पेस्ट
  • मीठ
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • तांदळाचे पीठ
  • कोथिंबीर
  • तेल
  • पाणी

हेही वाचा : १ वाटी दुधात बनवा विना चिकाचा खरवस; ‘ही’ सिक्रेट पेस्ट वाचवेल वेळ, मास्टरशेफचा स्पर्धक सॅमची रेसिपी, पाहा Video

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

कृती

  • सुरूवातीला चार पाच तुमच्या प्रमाणानुसार चौकोनी ब्रेड स्लाइस घ्या.
  • एका भांड्यामध्ये पाणी टाकून हे स्लाइल भिजवून घ्या.
  • भिजवल्यानंतर त्या ब्रेडमधून पाणी काढून घ्या आणि हाताने हे ब्रेड कुस्कुरून घ्या.
  • त्यानंतर उभा कांदा चिरा आणि चिरलेला कांद्याला ब्रेडच्या भांड्यामध्ये टाका.
  • त्यानंतर बारीक चिरलेली मिरची यात टाका.
  • बटाटा सोलून घ्या आणि त्यानंतर बटाट्याचा बारीक किस पाडा.
  • हा स्वच्छ पाण्याने धुवून हा किस सुद्धा त्यात टाका.
  • त्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाका.
  • चवीनुसार मीठ टाका. हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि इतर मसाला टाका.
  • सर्वात शेवटी तांदळाचे पीठ त्यात टाका.
  • त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • हे सर्व पदार्थ एकत्र करा आणि याचे मिश्रण तयार करा.
  • गॅसवर कढई ठेवा आणि कढईत तेल गरम करा.
  • गरम तेलातून पकोडे तळून घ्या.
  • अगदी झटपट होणारा हा पदार्थ तुम्ही केव्हाही करू शकता.