Crispy Butterfly Samosa Recipe:  समोसा हा असा पदार्थ आहे जो लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. सगळेच अगदी आवडीने हा खमंग पदार्थ खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. समोस्याचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. सगळ्यांनीच समोसा, पोटली समोसा असे समोस्याचे अनेक प्रकार ट्राय केले असतील. पण कधी तुम्ही बटरफ्लाय समोसा खाल्ला आहे का? ही नवीन रेसिपी तुम्ही घरच्याघरी ट्राय करू शकता. कुरकुरीत, खमंग असा हा बटरफ्लाय समोसा तुम्हाला बनवून पाहायचा असेल तर लगेच साहित्य आणि कृती वाचा.

साहित्य

मैदा

मीठ

२ चमचे तेल

२ उकडलेले बटाटे

१ चिरलेला कांदा

१ चिरलेली हिरवी मिरची

अर्धा चमचा मीठ

अर्धा चमचा हळद

अर्धा चमचा गरम मसाला

टोमॅटो केचअप

हेही वाचा… Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल

कृती

  1. मैदा, मीठ, २ चमचे तेल आणि पाणी घालून मळून मऊ पिठ तयार करा.
  2. बटाट्याच्या फिलिंगसाठी: २ उकडलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घ्या.
  3. पिठाची छोटी पोळी तयार करा आणि त्यात फिलिंग भरा.
  4. कड्यांना पाणी लावून बटरफ्लाय समोश्याचा आकार द्या.
  5. कमी ते मध्यम आचेवर तेलात डीप फ्राय करा.
  6. टोमॅटो केचअप सोबत गरमागरम सर्व करा.
  7. तुमचा स्वादिष्ट आणि कुरकुरीत बटरफ्लाय समोसा तयार आहे!

हेही वाचा… एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.