Batata Crispy Dosa Recipe Video: बटाटा हा बहुपयोगी म्हणून ओळखला जातो, काचऱ्या, उकडलेली भाजी, पाणीपुरीचा रगडा, चिप्स, फ्राईज, पापड अगदी म्हणाल त्या रूपात बटाटा आपल्या पोटाचा मार्ग धरतोच. आज आपण याच बटाट्याची एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. भारतात नाष्ट्याचे अनेक प्रकार प्रसिद्ध असले तरी दक्षिण भारतातील डोश्याचे चाहते जरा जास्त आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण डोसे करायचे म्हणजे डाळ- तांदूळ भिजवा, वाटा, आंबवा असे सगळे सोपस्कार करावे लागतात, यामध्ये आरामात १० तास तरी जातात यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की डोसे काय हवे तेव्हा घरी बनवून खायची गोष्ट नाही. पण, पण पण.. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे जुगाड असतोच. तसाच आज आपण २ बटाटे व १ वाटी तांदळाचे पीठ वापरून झटपट डोश्यांचा जुगाड पाहणार आहोत.
साहित्य
२ कच्चे बटाटे
१ वाटी तांदळाचे पीठ
२ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
१ वाटी तांदळाचे पीठ
२ कप पाणी
गाजर, कांदा (बारीक कापून)
मसाला, मीठ, चाट मसाला (चवीनुसार)
कोथिंबीर, पांढरे तीळ (पर्यायी)
कृती
२ मध्यम बटाटे कापून घ्या, त्यात दोन हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घालून वाटून घ्या. या मिश्रणात तांदळाचे पीठ व पाणी मिसळून घ्या मग त्यात १ बारीक चिरलेला कांदा आणि किसलेलं गाजरं घालून मग त्यात चवीनुसार मीठ, मसाला, चाट मसाला मिसळून घ्या शेवटी थोडी ताजी चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ घाला. हे मिश्रण तव्यावर पसरवून मग छान कुरकुरीत डोसे काढून घ्या.
Video: बटाटा डोसा रेसिपी
हे ही वाचा<<रोपांची पानं सुकून पिवळी पडलीयेत? २०० मिली पाण्यात ‘हे’ दोन पदार्थ मिसळून आणा नव्याने बहर, पाहा Video
एक टीप म्हणजे जेव्हा तुम्ही तव्यावर मिश्रण पसरवणार असाल त्याआधी तेल टाकून ब्रशने पसरवून घ्या व त्यावर मिठाच्या पाण्याचा एक हपका मारून घ्या, यामुळे डोसे तयाला चिकटत नाहीत व सहज निघून येतात.