आजपर्यंत आपण सिमला मिरचीच्या भाजीत कायम बटाटा, टोमॅटो किंवा डाळीचे पीठ घालून बनवत आलो आहोत. जास्तीत जास्त सिमला मिरचीचा वापर सँडविच, पाव भाजी किंवा व्हेज पुलावमध्ये आपण करतो. मात्र अशा ठराविक पद्धतीने ही भाजी बनवण्याचा आणि त्याच-त्याच चवीची भाजी खाण्याचा अनेकांना कंटाळा येऊ शकतो.

त्यामुळे या सिमला मिरचीच्या भाजीला वेगळ्या [आढतीने कसे बनवायचे ते आज आपण पाहू. तुम्ही सिमला मिरचीच्या भाजीत ताक घालून खाल्ली आहेत का? ऐकायला फार विचित्र वाटत असलं, तरीही इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sagarskitchenofficial या अकाउंटने दाखवलेली ही भन्नाट रेसिपी एकदा नक्की करून पाहा. अतिशय सोपी, तसेच केवळ सिमला मिरची आणि कांदा वापरून बनवलेल्या या भाजीची रेसिपी एकदा पाहा आणि वाटल्यास बनवूनही पाहा.

हेही वाचा : Kitchen tips : मातीची भांडी वापरल्यावर कशी धुवावी? काय करावे, काय नको पाहा

साहित्य

सिमला मिरची
ताक
कांदा
कोथिंबीर
आले लसूण पेस्ट
हळद
तिखट
धणे पावडर
गरम मसाला
जिरे पूड
शेंगदाण्याचे कूट
मीठ
मोहरीचे तेल
हिंग
हिरवी मिरची

हेही वाचा : Sea food Recipe : घरच्याघरी खमंग पापलेट फ्राय कसा बनवायचा? पाहा ही रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम सिमला मिरची, कांदा भाजीसाठी चिरून घ्यावा. त्याबरोबर कोथिंबीरदेखील बारीक चिरून घ्यावी.
  • आता एका बाऊलमध्ये चिरलेली सिमला मिरची आणि कांदा एकत्र करा.
  • त्यामध्ये आले लसूण पेस्ट, हळद, तिखट, धणे पावडर, गरम मसाला, जिरे पूड घालून घ्या.
  • तसेच दोन चमचे दाण्याचे बारीक कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ घालावे.
  • सर्व पदार्थ एकदा नीट ढवळून घ्या.
  • आता एक पॅन गॅसवर ठेवा.
  • त्यामध्ये १-२ चमचे मोहरीचे किंवा तुम्ही वापरता ते तेल तापत ठेवा.
  • तेल तापल्यानंतर त्यामध्ये हिंग आणि बारीक चिरलेली तिखट हिरव्या मिरचीचे तुकडे घालून छान तडतडू द्यावे.
  • आता पॅनमध्ये मसाल्यात एकत्र केलेल्या भाज्यांचे मिश्रण घालून काही मिनिटे शिजवून घ्या.
  • भाज्या थोड्या शिजल्यानंतर त्यामध्ये साधारण अर्धा कप ताक घालून सर्व गोष्टी ढवळून घ्या.
  • शिजणारी भाजी सतत ढवळत राहा. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
  • हवे असल्यास वरून थोडे मीठ टाकून, सिमला मिरचीची भाजी १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.
  • दहा मिनिटांनंतर ताक घट्ट होऊन त्याची ग्रेव्ही तयार झाली असेल. तसेच सर्व पदार्थ शिजलेले असतील.
  • गॅस बंद करून झटपट तयार होणारी स्वादिष्ट सिमला मिरचीची ताकातली भाजी पोळी, भाकरी किंवा भातासह गरमागरम खाण्यास घ्यावे.
View this post on Instagram

A post shared by Sagar Kumar (@sagarskitchenofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sagarskitchenofficial या अकाउंटने ही झटपट तयार होणाऱ्या भाजीची भन्नाट रेसिपी शेअर केली आहे. आत्तापर्यंत या रेसिपी व्हिडीओला २.६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.