Champakali Recipe in Marathi: दिवाळी म्हणजे फराळ. मग घरातील स्त्रियांची फराळ काय काय बनवण्याची लगबग सुरू होते. मग फराळात वेगळे काय बनवायचे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळ्या, शेव, अनारसे असे पदार्थ सगळेच बनवतात. पण दिवाळीत आपण एक वेगळा पदार्थ बनवू शकतो तो पदार्थ म्हणजे चंपाकळी. आपला पारंपरिक पद्धती जपत आलेला आणि मुला- थोरांची आवडणारी अशी खुसखुशीत चंपाकळी.
दिवाळी फराळात चंपाकळी हा पदार्थ बनवला जातो तसेच लग्नकार्यातील रुखवतावर मांडण्याकरता चंपाकळी बनवली जाते. बनवायला सोपी आणि झटपट संपणारी अशा चंपाकळीची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.
साहित्य
- १ वाटी मैदा
- चिमूटभर मीठ
- ४ टेबलस्पून बारीक रवा
- पाणी
- २ टेबलस्पून तुपाचे कडकडीत मोहन
- 1/2 वाटी पिठीसाखर
- तेल
कृती
सर्वप्रथम मैदा आणि रवा एकत्र करून त्यामध्ये कडकडीत तुपाचे मोहन घालावे हे मोहन सुरुवातीला कोरडेच चमच्याने एकत्र करून घ्यावे व नंतर हाताने मळण्यास घ्यावे चिमूटभर मीठही त्यात घालावे.
थोडे थोडे पाणी घालत त्याचा घट्ट गोळा बनवून घ्यावा गोळा तयार झाल्यानंतर अर्धा ते एक तास तो झाकून ठेवावा.
त्यानंतर हा गोळा थोडा हाताने मळून घ्यावा आणि त्याचे पोळी लाटून घ्यावी. या पोळीला तूप आणि तांदळाच्या पिठाचे स्लरी बनवून लावावी आणि त्याचा रोल करून घ्यावा हा रोल कापून त्याचे गोळे बनवावेत.
आता एक एक गोळा घेऊन त्याचा त्याला लंबगोलाकार आकार द्यावा आणि त्याला मधोमध असे चार ते पाच काप द्यावेत आता कडेने त्याला गोल गोल वळत शेवटच्या टोकापर्यंत गोलाकार आकार द्यावा आणि त्याला आकार द्यावा कापल्यामुळे त्याला पाकळ्या पडतील.
आता गरम तेलामध्ये या चंपाकळ्या तळून घ्याव्यात थोड्याशा लालसर रंगावरती या चंपाकळ्या तळाव्यात.
चंपाकळी तळल्यानंतर ती गरम असतानाच त्याच्यावरती पिठीसाखर भुरभुरावी ही पिठीसाखर चंपाकळीला सर्व बाजूंनी भुरभुरावी म्हणजे ती चंपाकळीला चिकटली जाते जास्त साखर न लागल्यामुळे चंपाकळी छान खुसखुशीत लागते.
(नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.)