diwali besan ladoo recipe: दिवाळी म्हणजे घरात प्रकाश, आनंद व गोडवा यांचा सण. या सणात वेगवेगळ्या मिठाई खाल्ल्याने आनंद दुपटीने वाढतो. घरच्या घरी बनवलेल्या मिठाईत खास चव आणि प्रेम असते. यावेळी आपण गुजराती स्पेशल बेसनाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी पाहू. हे लाडू गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि स्वामी नारायण मंदिरात प्रसाद म्हणूनदेखील ते बनवले जातात. हे लाडू मऊ व सहज चघळता येणारे आहेत आणि तोंडात जाताच वितळतात.
बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
४ कप बेसन
१ कप तूप
२ कप पिठीसाखर
१/४ कप बदाम पावडर
१/२ टीस्पून इलायची पावडर
सजावटीसाठी :
१ टेबलस्पून बदामाचे तुकडे
बेसन लाडू बनवण्याची सोपी पद्धत :
प्रथम एका खोल नॉन-स्टिक तव्यामध्ये तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात बेसन घाला आणि ते चांगले मिसळा. मिश्रण नीट एकसारखे होईपर्यंत हलवत राहा. नंतर मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे बेसन भाजत राहा. या काळात ते सतत ढवळत राहणे खूप महत्त्वाचे आहे; अन्यथा बेसन जळू शकते. ते हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजा. जेव्हा बेसन नीट भाजले जाईल, तेव्हा गॅस बंद करा आणि मिश्रण एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड होऊ द्या. मिश्रण थंड होणे खूप महत्त्वाचे आहे, कारण- जर तुम्ही गरम मिश्रणात साखर घातली, तर लाडू व्यवस्थित बसणार नाहीत. मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, बदाम पावडर व वेलची पावडर घाला. सर्व साहित्य चांगले मिसळेपर्यंत ढवळत राहा.
मिश्रण हलक्या हाताने मळून घ्या, जेणेकरून ते घट्ट होणार नाही. आता तुम्ही ते चाखून पाहा आणि गरज पडल्यास त्यात थोडी जास्त साखर किंवा वेलची घालू शकता. नंतर या मिश्रणाचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे लाडू बनवू शकता. शेवटी वर बदामाचे तुकडे घालून मस्तपैकी ते सजवा. आता पाहा बेसनाच्या लाडूला शेवटी वर बदामाचे तुकडे घालून मस्तपैकी ते सजवा. आता पाहा तुमचे मऊ, खुसखुशीत आणि अतिशय स्वादिष्ट बेसन असे लाडू तयार आहेत.हे लाडू हवाबंद डब्यात ठेवले, तर १५ दिवस टिकतात. जर तुम्हाला ते जास्त काळ टिकवून ठेवायचे असेल, तर ते तुम्ही फ्रिजमध्येही साठवू शकता.
बेसन लाडू बनवताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
१. बेसन लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास १५ दिवस टिकतात.
२. जास्त काळ टिकवण्यासाठी ते फ्रिजमध्ये साठवता येतात.
३. स्वादिष्ट लाडू बनविण्यासाठी चांगल्या दर्जाचे तूप वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
४. जर तुम्हाला थोडे दाणेदार बेसन आवडत असेल, तर बारीक बेसनात थोडा रवा मिसळा.
५. खुसखुशीत करण्यासाठी बारीक दळलेली साखर वापरावी.
दिवाळीत हे घरगुती गुजराती बेसन लाडू नक्कीच सर्वांना आवडतील. त्यांची गोड आणि खमंग चव सणाचा आनंद द्विगुणीत करते.