Karanji Recipe : सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. सणावाराला सुरुवात झाली आहे. सणावाराला आवर्जून बनविणारा पदार्थ म्हणजे करंजी. अनेकजणांची तक्रार असते की करंज्या तळताना फुटतात. जर तुमच्या करंज्या तळताना फुटतात का? टेन्शन घेऊ नका या खास टिप्सचा वापर करुन तुम्ही खुसखुशीत करंज्या बनवू शकता.

साहित्य :

ओला नारळ
किसलेला गूळ
वेलची पूड
मैदा
रवा
तूप
दूध
तेल

हेही वाचा : विदर्भ स्पेशल खमंग पौष्टिक मेथीचे आळण असे बनवा घरी, ही सोपी रेसिपी जाणून घ्या

कृती :

  • नारळ आणि गूळ एकत्र करुन मध्यम आचेवर शिजवा.
  • त्यात वेलचीपूड टाका आणि घट्टसर मिश्रण करा.
  • एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करा.
  • त्यात गरम तूप करुन मोहन घाला.
  • मोहन घातलेले त्यात चांगले मिक्स करा.
  • त्यात गार दूध घाला आणि पीठाचा गोळा चांगला मळून घ्या.
  • करंजी करण्यासाठी पिठाचा लहान गोळा करा आणि पातळसर पुरी लाटा.
  • करंजीच्या साचाचा वापर करा आणि पातळ पुरी त्या साचावर ठेवा
  • एक चमचाभर नारळाचे सारण टाका.
  • पुरीच्या अर्ध्या कडेला थोडे दूध लावा.
  • पुरीची अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर ठेवावी आणि दोन कडा नीट चिकटतील, याची काळजी घ्यावी.

हेही वाचा : Sabudana Chivda : श्रावणात बनवा टेस्टी साबुदाणा चिवडा, ही रेसिपी नोट करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करंजी तळताना फुटतात का? या टिप्स ठरतील फायदेशीर

  • मिश्रण कधीही ओलसर असू नयेत नाहीतर करंजी नरम पडते आणि फूटू शकते.
  • पुरीच्या अर्ध्या कडेला आवर्जून दूध लावावे यामुळे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही.
  • करंजीच्या कडा चिकटवताना सारण बाहेर येणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • मध्यम आचेवर नेहमी करंजी तळावी.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)