Ulta Vadapav Recipe : वडापाव हा अनेकांना आवडणारा पदार्थ आहे असा क्वचितच कोणी असेल की ज्याला वडापाव आवडत नाही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने वडापाव खातात. अनेकांची भूक भागवणारा वडापाव खूप लोकप्रिय आहे. तुम्हालाही वडापाव आडतो का आणि तुम्ही मुंबईचा वडापाव खाल्ला का? कदाचित काही लोकं हो म्हणतील. पण तुम्ही कधी उल्टा वडापाव खाल्ला आहे का? होय, उल्टा वडापाव. नाशिक येथील लोकप्रिय असा उल्टा वडापाव कसा बनवला जातो, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही घरच्या घरी हा टेस्टी उल्टा वडापाव तयार करू शकता. हा चवीला अत्यंत स्वादिष्ट असून बनवायला तितकाच सोपी आहे. नाशिकचा हा उल्डा वडापाव अतिशय लोकप्रिय असून तुम्ही अगदी सहजपणे हा वडापाव घरी बनवू शकता. वडापाव प्रेमीला हा वडापाव खूप आवडेल. चला तरी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

  • बटाटे
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • हळद
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • हिरवी मिरची
  • आले
  • लसूण
  • पाव
  • मीठ

हेही वाचा : अशीही बनवाबनवी! सायकलपासून बनवली रस्त्यावर धावणारी रेल्वेगाडी, कामगारांचा अनोखा जुगाड पाहिला का?

कृती

  • बटाटे उकळून घ्या.
  • या बटाट्याची साल काढा आणि बटाटे हाताने बारीक करा.
  • सुरुवातीला गॅसवर कढई ठेवा आणि तेल गरम करा.
  • तेल तापले की त्यात मोहरी टाका.
  • त्यानंतर त्यात जिरे आणि हळद टाका.
  • त्यानंतर लिंबाचा रस टाका.
  • त्यानंतर त्यात बारीक वाटून घेतलेले आलं लसूण आणि हिरवी मिरची टाका.
  • त्यानंतर त्यात बारीक केलेले बटाटे टाका
  • शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर या बटाट्यामध्ये मीठ टाका आणि चांगले एकत्र करा.
  • बटाट्याची भाजी तयार होईल.
  • एका भांड्यामध्ये बेसन घ्या.
  • त्यात मीठ, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • त्यानंतर त्यात पाणी टाका आणि भज्यांप्रमाणे मिश्रण घट्ट ठेवा
  • एक पाव घ्या. ते मधून नीट कापून घ्या.
  • त्यानंतर बटाट्याची भाजी पावामध्ये भरा.
  • लसणाची चटणी त्यावर टाका आणि त्यानंतर वडापाव पॅक करा.
  • असे तुम्हाला वाट्टेल तेवढ वडापाव पॅक करून ठेवा
  • गॅसवर एका कढईत तेल गरम करा
  • पॅक केलेले वडापाव बेसनाच्या भिजवलेल्या मिश्रणामध्ये बुडवून तेलातून काढून घ्या.
  • कमी आचेवर नीट तळून घ्या.
  • उल्टा वडापाव तयार होईल.
  • हा उल्टा वडापाव तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.