शेफ नीलेश लिमये

साहित्य :

* ४-५ शेवग्याच्या शेंगा

*  ड्रेसिंगसाठी – ३-४ चमचे शेझवान सॉस, कांदापातीच्या २-३ पात्या. अडीच इंच आले, १चमचा तेल, चवीसाठी मीठ, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर.

*  मीठ – मिरपूड चवीकरिता.

* बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती :

*  कांदापात बारीक चिरून घ्या. शेवग्याच्या शेंगा प्रेशर कुकरमध्ये मिठाच्या पाण्यात वाफवून घ्या. शक्यतो ३ शिट्टय़ा करा.

*  ड्रेसिंगसाठी – एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात शेझवान सॉस घाला. आता त्यात आले आणि पातीचा कांदा घालून परता. ड्रेसिंग गार करून घ्या.

*  ड्रेसिंग गार झाल्यावर त्यात शेवग्याच्या शेंगा घोळवून घ्या. थंडगार सव्‍‌र्ह करा. चवीला मीठ-मिरेपूड आहेच आणि वर कोथिंबीर भुरभुरून सजावट करा.

*  शेवग्याच्या शेंगा हा मराठी खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा प्रकार. आम्ही पूर्वी जिथे राहायचो त्या गल्लीत सर्वाच्या अंगणात शेवग्याचं झाड होतंच. शेवग्याच्या शेंगांचं वरण, सांबरामध्ये घातलेल्या शेवग्याच्या शेंगा हे स्वाद अगदी आपल्या जिभेला खास लक्षात असलेले. आपल्या गुणकारी वैशिष्टय़ांमुळे आता परदेशातील मंडळीनाही हा शेवगा खुणावून लागला आहे.

*  मी हे सॅलॅड शेजवान सॉसमध्ये केले आहे. पण तुम्ही हिरवी चटणी, चाट मसाला असे इतरही पर्याय वापरू शकता. तुम्ही मस्तपैकी सॅलॅड तयार करा आणि कसं वाटलं ते नक्की कळवा!

nilesh@chefneel.com