Gajar Moong Dal Koshimbir Recipe In Marathi: सध्या बरेचसे लोक आहाराकडे लक्ष देत असल्याचे पाहायला मिळते. वजन नियंत्रणात राहावे यासाठी व्यायामासह आहारदेखील महत्त्वपूर्ण असतो. सकाळी लवकर उठून भरपूर नाश्ता करणे शरीरासाठी योग्य असते असे म्हटले जाते. सकाळच्या भरपेट नाश्त्यानंतर पुढे दुपारी हलका आहार घ्यावा असेही लोक सांगत असतात. अनेकजण आता दुपारच्या जेवणामध्ये सलाडसारखे पदार्थ खात असल्याचे पाहायला मिळते. पण नेहमीचं साधं सलाड किंवा सॅडविच खाऊन कंटाळा येऊ शकतो. तुम्हीही असेच कंटाळले असाल, तर तुम्ही गाजर-मूग डाळ कोशिंबीर हा ऑप्शन ट्राय करु शकता.
साहित्य –
- १ मोठे गाजर (किसलेले)
- मूग डाळ (बिन सालाची) २ मोठे चमचे
- लिंबाचा रस १ चमचा
- मोहरी पाव चमचा (वाटून)
- मिरची १ (बारीक चिरून अथवा वाटून)
- कोथिंबीर २-३ चमचे (बारीक चिरलेली)
- एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल दीड चमचा
कृती –
- गाजर नीट स्वच्छ धुवून किसून घ्या.
- एका भांड्यात किसलेले गाजर, भिजवलेली मुगाची डाळ आणि इतर जिन्नस एकत्र करा.
- त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वरून घाला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही हलका आहार घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्ही गाजर-मूग डाळ कोशिंबीर/ सलाद खाऊ शकता.