तुम्हाला मासे खायला आवडतात का? तुमचं उत्तर होय असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. तुम्ही नेहमी मासे खात असाल तर तुम्हाला माहित असेल की कोळंबी हा देखील माश्यांमधीलच एक प्रकार आहे. कोळंबी अतिशय चवदार असते. विशेष म्हणजे त्यात काटे नसल्यामुळे ती सहज खाता येते. तुम्ही हळद-मसाला घालून मसाला कोळंबी किवा रव्यात घोळून कोंळबी फ्राय किंवा चविष्ट कोळंबीचा भात नेहमी खात असाल. पण आज आम्ही तुम्हाला कोंळबीची थोडी वेगळी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही कधी कोंळबीचे चिलचिले खाल्ले आहेत का? नसेल तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या…
कोळंबीचे चिलचिले तयार करण्याची रेसिपी
कोळंबीचे चिलचिलेसाठी लागणारे साहित्य
पाव किलो कोळंबी, ४-५ मोठे कांदे, २ मोठे चमचे आलं -लसून वाटण, २ मोठे चमचे लाल तिखट, १ मोठा चमचा गरम मसाला, अर्धा मोठा चमचा हळद, २ मोठे चमचे चिंचेचा कोळ, ४ मोठे चमचे सुक खोबरं, अर्धी वाटी तेल, मीठ चवीनुसार.
हेही वाचा – बटाट्याचे फ्रेंच फ्राईज खाऊन कंटाळात? मग आता घरीच तयार करा रव्याचे फ्राईज, पाहा सोपी रेसिपी
कोळंबीचे चिलचिले तयार करण्याची कृती
कांदे बारीक कापून घ्या. सुकं खोबरं भाजून बारीक वाटून घ्या. कोळंबी स्वच्छ धुवून घ्या. कढईत तेल गरम करा व त्यात कांदा परतावा. नंतर त्यात आलं-लसूण वाटण टाका. नंतर हळद, लाल तिखट टाकून थोडे परतून कोळंबी टाका, नंतर सुकं खोबरं चिंचेचा कोळ, मीठ टाकून एक वाफ आणा.