Kolkata Style Puchka/ Panipuri Recipe: होळीच्या निमित्ताने गोडाची पुरणपोळी, चटकदार भज्या- वडे असे पदार्थ सगळीकडेच होतात. पण जर तुम्ही यंदा होळी स्पेशल पार्टीचे आयोजन करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला थोड्या हटके रेसिपी आम्ही सुचवणार आहोत. अगदी घरगुती पार्टी असो किंवा मोठी मित्रांची गॅंग येणार असो, जवळपास ९० टक्के लोकांना खुश करणारा एक पदार्थ आज आपण झटपट करायला शिकूया. अर्थात तुम्हाला अंदाज आलाच असेल हा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. पुदिन्याची, जिऱ्याची, सहा फ्लेव्हरची पाणीपुरी आपण घरी करून पाहिली असेलच पण आज आपण अस्सल कोलकाता स्टाईल पुचका पाणीपुरी कशी करायची हे पाहूया.
पुचकासाठी रगडा कसा बनवायचा? (साहित्य)
- ३ उकडलेले बटाटे
- १/२ कप उकडलेले काळे चणे
- १ टीस्पून सैंधव मीठ
- १/२ टीस्पून लाल मिरची पावडर
- १ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
- आवश्यकतेनुसार कोथिंबीर
- १ लिंबाचा रस
- २-३ चमचे चिंचेचा कोळ
- १/२ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर
पुचका मसाला (कृती )
- १ टीस्पून जिरे
- १ टीस्पून धणे
- १/४ टीस्पून मेथी दाणे
- १/२ टीस्पून मिरपूड
- ४ लवंगा
- १ मोठे तमालपत्र
- १/२ टीस्पून ओवा
- ६-७ सुक्या लाल मिरच्या
हे सर्व कोरडे भाजून घ्या. थंड होऊ द्या आणि बारीक वाटून घ्या. यात 1 टीस्पून आमचूर पावडर घाला आणि चांगले मिक्स करून घ्या, अधिक प्रमाणात बनवल्यास तुम्ही सहा महिने हा मसाला वापरू शकता.
पुचका पाणी
अर्धा कप पाण्यात १/३ कप चिंच भिजवून त्याचा कोळ काढून घ्या. मग पाण्यात चिंचेचा कोळ, लिंबू (सालांसहित) आधी पिळून घ्या, यामध्ये सैंधव मीठ, लाल मिरची पूड, पुचका मसाला, चाट मसाला चवीनुसार घालून घ्या. यामध्ये साधारण १ चमचा मिरचीची पेस्ट व न कुस्करता कोथिंबिरीची पाने घाला. हे सर्व काही साधारण १ लिटर पाण्यात मिसळून मग गरज वाटल्यास थोडा गोडवा येण्यासाठी गुळाचा खडा घालू शकता.
इंस्टाग्रामवर स्नेहा सिंग या क्रिएटरने शेअर केलेली पुचका रेसिपी पाहा
हे ही वाचा<< खरवस, बर्फीसारखं घट्ट दही घरी बनवा; विरजणाची गरजच नाही; ‘ही’ रेसिपी आहेच भारी
आपल्याकडे मिळणाऱ्या पाणीपुरीच्या पुऱ्या बाहेरून आणून मग नेहमीप्रमाणे पाणीपुरीच्या पद्धतीने तुम्ही हा पुचका खाऊ शकता. काही ठिकाणी या पाण्यात काकडीचे कापही घातले जातात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा व कशी होते नक्की कळवा .