सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. पोहे, उपमा, शिरा हे पदार्थ करून आणि खाऊनही कंटाळा येतो. पण, अशावेळी घरात उपल्बध असणाऱ्या पदार्थांपासून काही तरी वेगळं आणि हटके करता आलं तर अगदीच उत्तम. तर आज सोशल मीडियावर एका युजरने एक अनोखी रेसिपी सांगितली आहे. रव्यापासून शिरा, उपमा हा पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर “रवा टोस्ट” हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पाहा. तर ‘रवा टोस्ट’ या पदार्थाची सोपी रेसिपी पाहू.

साहित्य :

  • १ कप दही
  • १.५ कप रवा
  • कांदे
  • भोपळी मिरची (पिवळी, हिरवी, लाल)
  • किसलेले गाजर
  • आलं
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • मीठ
  • लाल तिखट
  • ओरेगॅनो
  • काळी मिरी
  • चाट मसाला

हेही वाचा…घरच्या घरी बनवा संत्र्याचे गारेगार आईस्क्रीम; जाणून घ्या सोपी अन् हेल्दी रेसिपी

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • एका बाऊलमध्ये दही, रवा, घालून मिश्रण मिक्स करा आणि त्यात थोडं पाणी घालून त्याचे बॅटर बनवून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, भोपळा मिरची, गाजर, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, ओरेगॅनो, काळी मिरी, चाट मसाला, मीठ, आदी सर्व घालून मिश्रण एकजीव करून घ्या व त्यावर ढाकण ठेवा.
  • १५ मिनिटे मिश्रण असंच ठेवा.
  • त्यानंतर त्यावर थोडं तेल सोडा आणि त्यावर ब्रेड ठेवा.
  • तयार करून घेतलेलं मिश्रण ब्रेडवर लावून घ्या आणि थोडं तेल सुद्धा घाला.
  • नंतर ब्रेड परतवून घ्या आणि ब्रेड भाजल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • त्यानंतर ब्रेडचे त्रिकोणी काप करून घ्या आणि टोमॅटो सॉसबरोबर खा.
  • अशाप्रकारे तुमचा ‘रवा टोस्ट’ तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @home_cooked_bliss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.