How To Make Ambyacha Raita : आंब्यांचा सीझन सुरु झालाय. तुम्हीही नक्कीच आंब्याची पेटी नक्कीच विकत घेतली असेल ना? हो… तर मग फक्त आमरस, आंब्याचे आईस्क्रीम, आंब्याचे लोणचं, आंब्याचे मोरंबा, आम्रखंड, आंब्याचे मिल्कशेक, आंब्याची स्मूदी खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास मालवणी, झणझणीत रेसिपी घेऊन आलो आहोत. तर या रेसीपीचे नाव आहे ‘आंब्याचे रायते’. तर कसा बनवायचा आंब्याचा हा पदार्थ चला जाणून घेऊयात…
कृती (Ambyacha Raita Ingredients)
- ६ ते ७ आंबे
- तिखट मसाला
- कडीपत्ता
- लसूण
- मोहरी
- जिरे
- गूळ
- मीठ
- पाणी
- तेल
साहित्य (How To Make Ambyacha Raita)
- मार्केटमधून ६ ते ७ पिकलेले रायवळ आंबे आणा आणि स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर गॅसवर टोप ठेवा. टोपात पाणी घालून त्यात आंबे उकळवून घ्या.
- त्यानंतर आंबे थंड होऊ द्या आणि नंतर आंब्याच्या साली काढून घ्या.
- आंब्याच्या सालीला उरलेला आंब्याच्या रस असतो तो हाताने पिळून घ्या आणि साल फेकून द्या.
- नंतर एका ताटात उकळवून घेतलेल्या आंब्यात, थोडा गूळ, तिखट मसाला, थोडंसं मीठ टाका आणि एकजीव करून बाजूला ठेवून द्या.
- त्यानंतर टोपात तेल घ्या आणि लसूण, मोहरी, जिरे, कडीपत्ताची फोडणी द्या.
- नंतर आंब्याचे तयार करून घेतलेले मिश्रण त्यात घाला.
- जेवढा रस पाहिजे असेल तितकं पाणी घातलं तरी चालेल.
- नंतर १० मिनिटे शिजू द्या.
- उकळल्यानंतर गॅस बंद करा.
- अशाप्रकारे तुमचा आंब्याचे रायते तयार.
- तुम्ही आंब्याचे रायते फ्रिजमध्ये ठेवलात तर दोन दिवस व्यवस्थित राहू शकते.
आंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Mango)
डॉक्टर मिथल यांनी एक वाटी कापलेला आंबा जो वजनाने साधारण १६५ ग्रॅमचा असू शकतो, त्यातील पोषक सत्वांचे प्रमाण सांगितले आहे.ज्यामध्ये कॅलरीज: ९९ kcal, प्रथिने: ०.८ – १ ग्रॅम, चरबी: ०. ६३ ग्रॅम, कार्ब्स: २४.८ ग्रॅम, फायबर: २.६४ ग्रॅम, पोटॅशियम: २७७ मी, व्हिटॅमिन सी- ६०.१ मिलीग्राम, फोलेट: ७१ एमसीजी आणि आंब्यामध्ये मॅग्नेशियम, तांबे आणि ओमेगा ३ आणि ६ फॅटी ॲसिड्स सारखी महत्त्वपूर्ण खनिजे देखील असतात.