Garlic Chicken recipe: आता नऊ रात्रीचे नऊ दिवसाचे उपवास संपले आहेत. त्यामुळे आता नॉनव्हेज प्रेमींना चिकन मटण खाण्याची नक्कीच इच्छा झाली असणार. पण नेहमीचंच चिकन, मटण खाऊन बोर झाला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत. आज ट्राय करा स्पेशल गार्लिक चिकन, लसणाची इतकी जबरदस्त चव यामध्ये लागते की एकदा खाल तर खातच रहाल. चला तर जाणून घेऊयात याची सोपी रेसिपी…

गार्लिक चिकन साहित्य :

  • १ किलो चिकन
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ३ ते ४ लसूणचे कांदे
  • ४०० ग्रॅम दही चिकन मसाला गरम मसाला
  • हळद, कसूरी मेथी
  • काश्मिरी मिर्च पावडर चवीनुसार मीठ

गार्लिक चिकन कृती :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • प्रथम चिकनला मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या.
  • एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही, एक चमचा तेल, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे.
  • नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मॅरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे.
  • गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कस्तूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या.

हेही वाचा >> “चटपटीत खानदेशी कढी” कमी साहित्याची महाराष्ट्रीयन दही कढी नक्की ट्राय करा…

  • चिकनच्या तुकडयांना हात न लावता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा व गॅस बंद करा.