खाण्याच्या प्रेमापोटी खवय्ये लोकप्रिय पदार्थावर ताव मारताना दिसतात. जे घरात बनतं ते हॉटेलमध्ये जाऊन का खायचं? त्यात जर तुम्ही नॉनव्हेज लव्हर, नॉनवेजचे शौकीन असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त रेसिपी घेऊन आलो आहोत. चटकदार आपल्या सगळ्यांनाच चिकनचे प्रदार्थ खायला आवडतात. नॉन व्हेज आवडीने खाणाऱ्यांसाठी ही रेसिपी नक्की तोंडाला पाणी आणणारी ठरु शकते. चला तर मग पाहुयात कसा बनवायचा चिकन पराठा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिकन पराठा साहित्य –

  • चिकन खिमा पाव कप, गव्हाचे पीठ अर्धा कप
  • तेल २ चमचे
  • आलं-लसूण पेस्ट अर्धा चमचा
  • हळद, लाल तिखट, धणे पूड पाव चमचा
  • जिरे पूड पाव चमचा, मीठ चवीनुसार

चिकन पराठा कृती –

प्रथम तेलावर आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यामध्ये चिकन खिमा, हळद, लाल तिखट, धणे, जिरे मीठ घालून १० मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यावे. तयार झालेले मिश्रण कणकेचा गोळा करून त्यात भरून आणि पराठा लाटा. परठा लाटून झाल्यावर तव्यावर बटक किंवा तेल असं आपल्या आवडीनुसार टाकून पराठा शेकवून घ्यावा.

हेही वाचा – Chicken momos: घरच्या घरी बनवा, हॉटेलसारखे चिकन मोमोज, जाणून घ्या सोपी मराठी रेसिपी

तुम्हीही हा चिकन पराठा नक्की ट्राय करा, आणि कशी होते रेसिपी हे आम्हाला कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make chicken paratha step by step recipe in marathi srk
First published on: 27-05-2023 at 12:47 IST