How To Make Bread Pizza : एखाद्याची बर्थडे पार्टी, मित्र-मैत्रिणींबरोबर पैज जिंकलो म्हणून तर घरी जेवण बनवण्याचा कंटाळा आला आणि काय खायला जाऊया ? या प्रश्नावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर ‘पिझ्झा’ हा पर्याय येतो. पिझ्झा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका आहे. शाकाहारी असो किंवा मांसाहारी पिझ्झा नेहमीच खवय्यांना भुरळ पडतो. पण, नेहमीच बाहेरून पिझ्झा ऑर्डर करून खाणे शक्य नसते व ते आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक ठरू शकते. त्यामुळे हा पिझ्झा जर घरीच बनवता आला तर. सोशल मीडियावर एका युजरने ‘ब्रेड पिझ्झा’ कसा बनवायचा हे सांगितलं आहे. तुम्हीसुद्धा लगेच ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या.

साहित्य –

  • ८ ब्रेडचे तुकडे, पिझ्झा सॉस, टोमॅटो केचअप, मॉझरेला चीज, १ कांदा, १ सिमला मिरची, १ टोमॅटो, स्वीट कॉर्न, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, कांदा, टोमॅटो, सिमला मिरचीचे उभे काप करून घ्या.

हेही वाचा…साखर न घालता करा पौष्टीक ‘ड्रायफ्रुट्सची बर्फी’; VIDEO तून सोपी रेसिपी लगेच नोट करा

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

  • सर्व प्रथम ब्रेडच्या कडा कापून घ्या.
  • आता सर्व ब्रेड एकमेकांच्या वर ठेवा आणि रोलिंग पिनने रोल करा जेणेकरून ते थोडेसे चिकटतील.
  • अशाप्रकारे चौकोनी आकाराचा पिझ्झा बेस तयार झाला.
  • आता त्यावर पिझ्झा सॉस, टोमॅटो केचअप आणि मेयोनीज लावा.
  • नंतर मॉझरेला चीज लावा आणि ब्रेडच्या ४ स्लाइसला पुन्हा झाकून ठेवा आणि तीच प्रक्रिया पुन्हा करा.
  • आता तुमच्या आवडीच्या भाज्या, मॉझरेला चीज, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला.
  • ७ मिनिटे १८० अंशांवर एअर फ्राईंग करावे.
  • अशाप्रकारे तुमचा ‘ब्रेड पिझ्झा’ तयार.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ @plate_it_with_shyama_thanvi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युजरने कृती आणि साहित्य नमूद केलं आहे. तसेच व्हिडीओतून तुम्ही ही रेसिपी पाहून झटपट करू शकता. अनेकदा बाहेरचं पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नसते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी असा हेल्दी पिझ्झा सहज बनवू शकता.