viral Video: स्वयंमापक घरात एखादा गोड पदार्थ बनवायचा असेल तर काजू, बदाम, अक्रोड, मनुका घालून त्या पदार्थांची चव आणखीन वाढवली जाते. खीर पासून ते अगदी आईस्क्रीमपर्यंत प्रत्येक पदार्थात या ड्रायफ्रुट्सचा समावेश असतो. आत्तापर्यंत तुम्ही ड्रायफ्रुट्सची बिस्कीट, लाडू, कॅडबरी नक्कीच खाल्ली असेल. पण, आज आपण साखर न घालता एक पौष्टीक ‘ड्रायफ्रुट्सची बर्फी किंवा चिक्की’ बनवणार आहोत ; जी बनवायला अगदीच सोपी आहे. चला तर पाहू या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य –

बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, खजूर, तूप, बटर पेपर इत्यादी.

कृती –

तुमच्या आवडीनुसार एका कढईत तूप घ्या त्यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, भोपळ्याच्या बिया घालून खरपूस भाजून घ्या. त्यानंतर खजूरातील बिया काढून घ्या आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर तुपात हे मिश्रण परतवून घ्या. नंतर त्यात खरपूस भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घाला आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर एका ट्रेमध्ये बटर पेपर घालून हे मिश्रण ओतून ते थापून घ्या व दोन तास तसंच ठेवा. त्यानंतर बर्फीचे तुकडे कापून घ्या. अशाप्रकारे तुमची ‘ड्रायफ्रूट बर्फी’ तयार.

हेही वाचा…‘स्टफ पोटॅटो’ कधी खाल्ला आहे का ? चटपटीत नाश्ता नक्की ट्राय करा; रेसिपी लगेच नोट करा

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @food.and.frolic इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने रेसिपीची कृती व्हिडीओत दाखवली आहे ; जी तुम्ही बघू शकता. ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने पोटही भरते आणि थकवा किंवा अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही. तसेच अनेकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा असते. त्यामुळे ही ‘ड्रायफ्रुट्सची बर्फी खाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.